आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यांची अवस्था बिकट:सिव्हिल मध्ये अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था; रुग्णांसाठी अडचण

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण रुग्णालयांतील रस्त्यांपेक्षाही जिल्हा रुग्णालयाच्या आतील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. यामुळे मात्र रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा रुग्णालय शासकीय मेडिकल काॅलेजला हस्तांतरित करण्यात आले आहे. मेडिकल प्रशासनाकडे रुग्णालय गेल्याने रुग्णालयाला सुविधा पुरवल्या जातील अशी अपेक्षा होती मात्र, ही अपेक्षा फोल ठरली आहे.

रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. आय वार्डकडून पुढे इन्फेक्शन कक्षाकडे जाणारा रस्ता उखडला आहे. मोठे खड्डे पडले आहेत. मेडिकल काॅलेज प्रशासनाकडून कक्षामध्ये राउंड घेतला जातो मात्र, परिसरात मेडिकल काॅलेजचे अधिकारी फिरकत नसल्याने समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. रुग्णालयाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाकडे आहे. मात्र, सिव्हिलकडे प्रशासन आणि मेडिकल काॅलेजकडे रुग्णसेवा असा करार असला तरी बांधकाम विभागाला पत्र कुणी द्यायचे याबाबत समन्वयाचा अभाव असल्याने रुग्णालयात समस्या वाढल्या आहे.

बातम्या आणखी आहेत...