आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअरुणाचल प्रदेशमध्ये देशाच्या संरक्षणार्थ सेवा बजावत असताना दिंडोरीतील प्रसाद कैलास क्षीरसागर या सैन्य दलातील जवानास सोमवारी (दि.१४) अपघाती वीरमरण आले. या घटनेने दिंडोरी शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव गुरुवारी (दि. १७) सकाळी दिंडोरीत येणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिंडोरी येथील प्रसाद कैलास क्षीरसागर हे भारतीय सैन्य दलात होते. सध्या ते अरुणाचल प्रदेशमध्ये सेवा बजावत होते. सोमवार सकाळी सैन्यदलाच्या कॅम्पमधून सैनिकी ट्रकद्वारे आपल्या सहकाऱ्यांसोबत सेवेच्या ठिकाणी जात असताना ट्रक दरीत कोसळल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. याबाबत सोमवारी सायंकाळी त्यांच्या मित्रांना याबाबत माहिती मिळाली, मात्र त्यास अधिकृत पुष्टी मिळाली नाही. त्यानंतर तालुका प्रशासनाने वरिष्ठ पातळीवरून सदर घटनेची माहिती घेतली. दुपारी लष्करी अधिकाऱ्यांनी दिंडोरी येथे तहसीलदार पंकज पवार यांची भेट घेत अंत्यसंस्कार तयारीचा आढावा घेतला. गुरुवारी सकाळपर्यंत त्यांचे पार्थिव दिंडोरी शहरात येणार असून त्यानंतर शासकीय इतमामात सिडफार्म जागेत अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. जानेवारीत ते सुटीवर आलेले होते. सुटी संपून ३० जानेवारीला ते दिंडोरीतून अरुणाचल प्रदेशमध्ये आपल्या सेवेसाठी रुजू होण्यासाठी रवाना झाले होते.त्यांच्या निधनाने शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.