आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती:डिप्लोमा फार्मसीच्या प्रथम फेरी प्रवेशासाठी उद्या शेवटची मुदत

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या सहा महिन्यानंतर अखेर डिप्लोमा फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीसाठी निवड यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोमवार दि. 12 डिसेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

13 डिसेंबरला दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर होईल. नाशिकमध्ये डिप्लोमा फार्मसी अभ्यासक्रमाची 32 महाविद्यालयांत दोन हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहे. प्रवेशासाठी एकूण तीन कॅप राउंड होणार आहेत.

डी. फार्मसी प्रवेश अर्ज नोंदणी प्रक्रिया जून महिन्यात सुरु झाली होती. त्यानंतर वारंवार मुदत वाढ देण्यात आली. तब्बल पाच ते सहा महिने केवळ प्रवेश अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरु होती. अखेर डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानुसार 8 डिसेंबरपर्यंत पहिल्या फेरीसाठी पसंतीक्रम नोंदविण्यासाठी मुदत होती. तर 9 डिसेंबरला निवड यादी झाली. त्यात संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी 10 ते 12 डिसेंबर या दरम्यान मुदत आहे. तर 13 डिसेंबरला रिक्त जागांचा तपशील प्रसिद्ध होईल. त्यानंतर 14 व 15 रोजी पसंतीक्रम नोंदवता येईल. 16 ला निवड यादी जाहीर होऊन 17 ते 19 पर्यंत प्रवेशाची संधी असेल. दुसऱ्या फेरीनंतर तिसऱ्या कॅप राउंडची प्रवेश प्रक्रिया होईल.

बी. फार्मसी व एम. फार्मसी या पदवी व पदवी इतर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बी. फार्मसी च्या पहिल्या कॅप राऊंडचे प्रक्रिया सध्या सुरू असून महाविद्यालयात सुविधा केंद्र सुरू झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...