आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्ती गोडसे यांची संकल्पना:राेजगार मेळाव्यातून 1274 बेरोजगारांना थेट नियुक्तिपत्र

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खा. हेमंत गोडसे यांच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यातून निवड झालेल्या १२७४ बेरोजगार तरुणांना थेट नियुक्तिपत्र देण्यात आले. उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे व खा. गोडसे यांच्या उपस्थितीत नियुक्तिपत्र वाटप झाले. युवती सेना पदाधिकारी भक्ती गोडसे यांच्या संकल्पनेतून हा मेळावा झाला.

५०० कोटींचे अनुदान मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी तीन वर्षांमध्ये केवळ १७० कोटी रुपये खर्च केले. तर सत्तांतर झाल्यानंतर पाच महिन्यांत मुख्यमंत्री शिंदे यांनी रोजगार निर्मिती योजनेसाठी ५०० कोटींचे अनुदान दिल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात असे रोजगार मेळावे होणे ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...