आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांनंतर नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरू:पहिल्याच दिवशी दिल्लीहून 91 तर, नाशिकहून 72 प्रवासी दिल्लीला रवाना

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वर्षानंतर नाशिककरांना आजपासून दिल्ली-नाशिक-दिल्ली अशी थेट विमानसेवा उपलब्ध झाली आहे. 180 आसनी विमानाद्वारे ही सेवा देण्यात येत असून पहिल्याच दिवशी दिल्लीहून नाशिकला 91 प्रवासी आले तर, नाशिकहून दिल्लीला 72 प्रवासी रवाना झाले. विशष म्हणजे, यापुर्वीची अहमदाबादमार्गे दिल्ली अशी विमानसेवा सुरू असल्याने नाशिककरांना दिल्लीकरीता आता दोन फ्लाइटस‌् उपलब्ध झाल्या आहेत.

5100 रुपयांपासून तिकिट

9 ऑगस्टपर्यंत नियोजनानुसार सकाळची वेळ मिळाल्याने नाशिककरांना दिवसभरात दिल्लीत पोहोचून कामे उरकणे शक्य होणार आहे. महत्वाची बाब म्हणजे 10 ऑगस्टपासून ही वेळ आणखी सव्वा तास लवकर करण्यात आली असल्याने सकाळी 10.45 वाजताच दिल्लीत पोहोचणे शक्य होणार आहे. उडाण योजनेंतर्गत ही सेवा असल्याने केवळ 5100 रूपयांपासून तिकिट बुकिंग शक्य आहे. तीन वर्षांपुर्वी जेट एअरवेजकडून नाशिक-दिल्ली ही विमानसेवा सुरू होती. ती कंपनी बंद पडल्याने अचानक ही सेवा बंद झाली होती. या सेवेला प्रवाशांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळत होता. आता स्पाइस जेटकडून पुन्हा ही सेवा सुरू झाली आहे.

आता या 5 शहरांसाठी मिळतेय विमानसेवा

- दिल्ली ( दोन फ्लाइट)

- अहमदाबाद

- हैद्राबाद ( कनेक्ट- तिरूपती)

- पुणे

- बेळगाव

बातम्या आणखी आहेत...