आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:सिटी लिंकच्या धडकेत‎ दिव्यांग महिला जखमी‎

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎द्वारका सर्व्हिसराेडकडून भगतसिंग‎ चौकाकडे पायी जाणाऱ्या महिलेला‎ सिटी लिंक बस (एमएम १५ जी व्ही‎ ७९८३) चालकाने निष्काळजीपणे‎ वाहन चालवून दिव्यांग महिला रेखा‎ रमेश रकटे (रा. भगतसिंग चौक,‎ द्वारका) येथे पाठीमागून धडक‎ दिल्याने या अपघातात रकटे जखमी‎ झाल्या आहेत. त्यांनी भद्रकाली‎ पोलिस ठाण्यात बसचालक रघुनाथ‎ चिमा राऊत (रा. विजय रेसिडेन्सी,‎ पेठरोड) याच्याविराेधात पोलिसांनी‎ गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी‎ चालक राऊत यास ताब्यात घेतले‎ असून जखमी रेखा रकटे यांना‎ उपचारासाठी रुग्णालयात दाखल‎ करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या‎ महिनाभरात सिटी लिंगच्या‎ बसकडून हा सलग चौथा अपघात‎ असल्याने नागरिकांकडून या‎ बसचालकांना योग्यप्रकारे प्रशिक्षण‎ दिले जावे, अशी मागणी केली जात‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...