आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रात्यक्षिकातून माहिती:विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रासबिहारी शाळेमध्ये नागरी संरक्षण कार्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. नागरी संरक्षण कार्यालयामधील कर्मचारी मनोहर जगताप यांनी त्यांच्या टीमसह विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. विविध आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे जगतापसरांनी निरसन केले. दुखापत आणि आग इत्यादीपासून पीडितांना मदत करण्यासाठी ड्रिल आयोजित करून आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक त्यांनी विद्यार्थ्यांसाठी सादर केले. आपत्कालीन परिस्थितीत पीडितांना घेऊन जाण्याचे व्यावहारिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले गेले.

फ्रॅक्चर, सर्पदंश, दुखापत, आजारपणात बचावासाठी आणि प्रथमोपचार तंत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या दोरीच्या नॉट‌्स बांधायचे प्रशिक्षण त्यांनी मुलांना दाखवले, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अग्निशामक यंत्राचा वापर कसा करावा हे शिकवले. विद्यार्थ्यांनी विविध परिस्थितींची प्रात्यक्षिके आत्मसात करण्यासाठी या उपक्रमात स्वेच्छेने सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांसाठी हे एक जागरूकतापूरक प्रात्यक्षिक होते.

बातम्या आणखी आहेत...