आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समस्या:एमआयडीसीमधील कंटेनर्सचा नागरी वसाहतीला विळखा

सातपूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैद्याेगिक वसाहतीत साहित्य घेऊन येणारे कंटेनर्स नागरी वसाहतीसह मुख्य रस्त्यांवरच उभे केले जातात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढतानाच सततच्या वाहतूक काेंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

नाशिक-त्र्यंबकेश्वर या राज्यमार्गावरील सातपूर परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी कंटेनर्स उभे केले जातात. याच रस्त्यावरून देशभरातून नागरिक त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जातात. मात्र, कंटेनर्सच्या बेशिस्त पार्किंगमुळे त्यांच्या वाहनांनाही अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभे असलेले कंटेनर्स वाहनचालकांना दिसत नाहीत. त्यामुळे नेहमी छाेटे-माेठे अपघात हाेतात. समृद्धीनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर या परिसरात रस्त्याच्या कडेलाच कंटेनर्स उभे केले जातात.

रात्रीच घडतात बहुतांश अपघात
एमआयडीसीमध्ये येणाऱ्या कंटेनर्सचे चालक रस्त्याच्या कडेला कुठेही कंटेनर्स उभे करून देतात. आैद्याेगिक वसाहतीत कामावर जाणाऱ्या व कामावरून येणाऱ्यांचे रात्रीच्या वेळेसच अपघात झालेले आहेत. त्यामुळे या कंटेनर्सचालकांना शिस्त लावणे गरजेचे झाले आहे. - वैभव राैंदळ

निवेदन देऊनही कारवाई नाही
रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीने कंटेनर्स उभे केले जातात. आैद्याेगिक वसाहतीत येणाऱ्या वाहनांना स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, त्यानंतरही रस्त्याच्या कडेला वाहने उभी केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. यासंदर्भात मनपा प्रशासनाला अनेकवेळा निवेदने दिलेली आहेत. - अॅड. कांचन तुपलाेंढे, सामाजिक कार्यकर्त्या

बातम्या आणखी आहेत...