आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्निचर व्यावसायिकाचे अपहरण करून खून:शवविच्छेदन अहवालातून खुलासा; नाशिकरोड ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये एका फर्निचर बनवणाऱ्या व्यावसायिकाचे अपरहण करून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. शवविच्छेदन अहवालात डोक्यावर अंतर्गत दुखापत झाल्याचे समजले. त्यातून हा प्रकार समोर आला.

नाशिकरोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरीष गुलाबराव सोनवणे (रा. नाशिकरोड) असे या व्यावसायिकाचे नाव असून, त्यांचा मृतदेह मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात आढळून आला होता.

घातपात केल्याचा संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड येथील के. के. मेहता हायस्कूल शेजारी असलेल्या किंग्स कोर्ट आपार्टमेंट राहणारे शिरिष सोनवणे (वय 56) यांचे एकलहरा रोडवर स्वस्तीक फर्निचर नावाचा कारखाना आहे. या कारखान्यामध्ये शालेय लाकडी बाक तयार केले जातात. गणपती विसर्जनाच्या दिवशी 09 सप्टेंबरला 4.30 वाजता सोनवणे कारखान्यात आले होते. यानंतर काही वेळीने सोनवणेंच्या कारखान्यात एक स्विफ्ट कारच्या चालकासह तीन व्यक्ती कारखान्यासमोर उतरले. तसेच त्यांनी कारखान्याचा कर्मचारी फिरोज लतिफ शेख याला सोनवणे यांना ऑर्डर द्यायची आहे, असे सांगून गाडी जवळ पाठवण्यास सांगतिले. मात्र, फिरोज याने त्यांना आपणच कारखान्यात चला असे सांगितले असता गाडीतील दिव्यांग असल्याचा संशयितानी बनाव केला. सोनवणे बाहेर आल्यावर ते संशयिताच्या गाडीत बसले. सोनवणे कुठेच सापडत नसल्याने अखेर संध्याकाळी उशिरा नाशिकरोड पोलिस ठाण्यात त्यांच्या पत्नीने बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. रविवारी सोनवणे यांचा मृतदेह कालव्यात आढळून आल्याने अपहरण करून घातपात केल्याचा संशयत व्यक्त करण्यात आला होता. सोनवणे यांच्या पश्च्यात पत्नी, मुलगी, मुलगा, सून असा परिवार आहे. वरिष्ठ निरिक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे शोध

संशयित कारचा सीसीटिव्हीच्या अधारे शोध सुरू आहे. कारखान्यातील सीसीटिव्ही बंद असल्याने तपासात अडचणी येत आहेत. पथकाने सिन्नर फाटा, एकलहरे रोड आणि पुणे रोडवरील सीसीटिव्ही तपासणी सुरू केली आहे.

संशयित ओळखीचे?

संशयित सोनवणे यांच्या ओळखीचे असण्याची शक्यता असून आर्थिक वादातून अथवा जमीनीच्या वादातून खुन झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांकडून सर्व बाजुने तपास सुरू असून लवकरच संशयितांना पकडले जाईल अशी माहिती वरिष्ठ निरिक्षक शिंदे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...