आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा:गणेश मंडळांना सवलतीत वीज

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक गणेशाेत्वस, नवरात्राेत्सव मंडळांना महावितरणकडून सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी देण्यात येणार आहे.गणेशोत्सवात महावितरणकडून गणेश उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या १०० युनिटसाठी केवळ ४ रुपये ७१ पैसे प्रतियुनिट, १०१ ते ३०० युनिटसाठी ८ रुपये ६९ पैसे प्रतियुनिट, ३०१ ते ५०० प्रतियुनिट वीज वापरासाठी ११ रुपये ७२ पैसे प्रतियुनिट आणि ५०० युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी १३ रुपये २१ पैसे दराने वीजपुरवठा देण्यात येणार आहे.

गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. विविध तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीसाठी २४ तास उपलब्ध असलेले 1912 किंवा 18001023435 किंवा 18002333435 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...