आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधील सकारात्मकता शोधत त्यातून जगण्याची प्रेरणा मिळत असते. खऱ्या अर्थाने जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरणाऱ्या अशा घटनांकडे आपल्या खास लेखणीतून लक्ष वेधणारे प्रख्यात मॅनेजमेंट गुरू एन. रघुरामन यांचा "दिव्य मराठी'तील "मॅनेजमेंट फंडा' हा कॉलम नाशिकच्या १४ वर्षांच्या अस्मी पेठकर या विद्यार्थिनीच्या आयुष्याला वेगळी दिशा देणारा ठरला.
कोविड काळातील नकारात्मक घटनांना बाजूला सारत अस्मी पेठकर हिने या दोन वर्षांच्या काळात तब्बल वेगवेगळ्या प्रकारची २५ कौशल्य प्राप्त केली. लॉकडाऊन काळातील या अनुभवांवर आधारित ‘कोविड महामारीने माझे जीवन कसे बदलले..’ या विषयावर तिने पहिले ई-बुक लिहिले आणि ते लॉन्च केले.
अस्मी पेठकरची नेत्रदीपक कामगिरी, २५ कौशल्ये अन् मिळवले ५० अवॉर्ड
कोविड काळात ऑनलाइन शिक्षण सुरू असताना अस्मी पेठकर हिने याच माध्यमातून वेगवेगळी कौशल्ये शिकण्यास सुरुवात केली. दोन वर्षांच्या या काळात तिने २५ वेगवेगळी प्रकारची कौशल्य प्राप्त केली. विशेष म्हणजे, तिने स्किल मिळवताना परीक्षांमध्येही सहभाग घेतला. त्यात तिला ३४ सर्टिफिकेट, ७ ट्रॉफी आणि १० मेडल असे ५० हून अधिक अवॉर्ड मिळवले आहे. तिने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी नक्की प्रेरणा देणारे आहे.
मॅनेजमेंट फंडाने बदलले आयुष्य
मी जेव्हा मॅनेजमेंट फंडा कॉलम वाचण्यास सुरुवात केली तेव्हा माझ्या आयुष्यात बदल होण्यास सुरुवात झाली. रोज मी नवनवीन गोष्टी शिकत गेले. ऑनलाइन शिक्षणाचा उपयोग करत मी वेगवेगळी कोर्सेस पूर्ण केले. स्वत: ई बुक लिहिले. आत्मविश्वास निर्माण करून मला सतत नवीन शिकण्याची प्रेरणा मॅनेजमेंट फंडा कॉलममधूनच मिळाली. - अस्मी पेठकर, नाशिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.