आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील एचएएल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देशाचे संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांची दिल्ली येथे भेट घेत विविध मुद्यांबाबत चर्चा केली. खासदार हेमंत गोडसे यांची वर्कलोडसंदर्भात भेट घेतल्यानंतर संघटनेने संरक्षण सचिवांची भेट घेतली. एचटीटी-४० एअरक्राफ्टला सरकारकडून प्राधान्य मिळावे, अशी मागणीदेखील करण्यात आली. एचटीटी-४० एक बेसिक ट्रेनर विमान असून त्याचा प्रयोग भारतीय वायुसेना रिटायर्ड एचपीटी-३२ दीपक विमानाच्या जागेवर केला जाईल.
स्वदेशी करणावर जास्त भर देण्यासाठी एलसीएची अधिक ऑर्डर लवकरच मिळणार आहे. त्याची एक लाइन नाशिकला देण्याची विनंती संघटनेतर्फे करण्यात आली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे अधिकच्या सुखोई-३० बनवण्याचा देण्यासंबंधीच्या चर्चेला वेळ लागत आहे, असेही या चर्चेत निदर्शनास आणून देण्यात आले. इस्राईल आणि भारत मिळून बनवत असलेल्या यूव्हीए यूएमएची ऑर्डर लवकरच मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला काही यूएव्ही मोड करण्याची ऑर्डर असेल. तद्नंतर १००-१२५ करण्याचे विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सदर ऑर्डर टेंडरिंग प्रोसेसमध्ये न टाकता थेट कंपनीला नॉमिनेशन बेसवर देण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
लखनौ, कानपूर, कोरवाला येथून बदलीवर गेलेल्या कामगार बांधवांना येत असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी लखनौ येथे जाऊन नाशिकच्या कामगारांची भेट घेतली. तेथील कामगार संघटनेचे अध्यक्ष अतुल कपूर यांची भेट घेत नाशिकच्या कामगार बांधवांना आवश्यक सहकार्य करण्याची सूचना देण्यात आली. नुकतेच बदली झालेल्या तसेच मागील युनियनच्या कार्यकाळात विनाकाळ बदली झालेल्या कामगार बांधवांना परत नाशिक विभागात आणण्यासाठी विद्यमान कामगार संघटना पाठपुरावा करेल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या चर्चेत खासदार हेमंत गोडसे, सरचिटणीस संजय कुटे, अध्यक्ष अनिल मंडलिक, खजिनदार प्रशांत आहेर, सहचिटणीस नितीन पाटील, गिरीश पाटील उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.