आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:शैक्षणिक संस्थांच्या मागण्यांबाबत राज्यपाल काेश्यारी यांच्यासह चर्चा

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या पदाचा तीन वर्षे कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल राजभवनात जाऊन ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे (पाटील) यांनी त्यांना चांदीची गणेशमूर्ती भेट देऊन सत्कार केला. त्याचवेळी शैक्षणिक संस्थांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा केली.

साेमवारी (दि. ५) राजभवनात महाराष्ट्रातील निवडक विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत राज्यपाल कोश्यारी यांच्या तीन वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनिमित्त आयाेजित कार्यक्रमास पानगव्हाणे-पाटील व पदाधिकारी उपस्थित हाेते. त्याप्रसंगी राज्यपालांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी लोकराज्यपाल, कॉफी टेबल बुक व राज्यपालांचे लोकसभा / राज्यसभा, उत्तराखंडचे विधानसभा सदस्य, मुख्यमंत्री व राज्यपाल म्हणून त्यांची निवडक १७ भाषणे संग्रहित करून तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी राजाराम पानगव्हाणे, अॅड. अशोक सोनवणे, प्राचार्य डॉ. अंकुर कुलकर्णी, राहुल गोडबोले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...