आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातोफा, रणगाडे, रायफल्स, रॉकेट लाऊंचर्स, इंडियन फील्ड गन, बोफोर्स, धनुष यासह सैन्यदलाच्या विविध शस्त्रांसह सिम्फनी बॅण्ड, आर्मी बॅण्ड, घोडदौड, टेन्ट पॅकिंग, डेअरडेव्हिल्स, जिमनॅस्टिक यांचे लाईव्ह शाे देखील हाेणार आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदाने येथे १८ आणि १९ मार्चला हे प्रदर्शन हाेणार असून प्रदर्शनाचे उद्घाटन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हाेणार आहे. युनायटेड व्ही स्टॅण्ड फाउंडेशन यांच्यातर्फे आणि खासदार हेमंत गाेडसे यांच्या पुढाकाराने हाेत असलेल्या या प्रदर्शनात केवळ आर्टिलरीच नव्हे तर इतर शस्त्रास्त्रे आणि सेवादेखील प्रदर्शित करणार आहोत.
तोफखाना (विविध तोफा), शस्त्रागार, अभियंता उपकरणे, हवाई दल, आर्मी एव्हिएशन, वैद्यकीय उपकरणे प्रदर्शन, पायदळ, आर्मी रेकॉर्ड स्टॉल (निवृत्त सैनिकांच्या सेवेसाठी), प्रादेशिक सैन्य शस्त्रे, सिम्फनी बँड, आर्मी बैंड, लाइव्ह शो (उदा. घोडदौड, टेन्ट पॅकिंग, डेअरडेव्हिल्स, जिम्नॅस्टिक) हे प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे. या प्रदर्शनाचे नागिरकांना सशस्त्र दलांच्या जीवनाशी परिचित होता येईल आणि तरुणांना सैनिकांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. अग्निवीर भरतीसंदर्भात देखील मार्गदर्शन केंद्र असणार आहे. कार्यक्रमास रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी, संरक्षण राज्यमंत्री अजय भट, सेनाप्रमुख जनरल मनोज पांडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युनायटेड व्ही स्टॅण्डचे अध्यक्ष सागर मटाले आदी उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शन माेफत असून नाशिककरांनी या अनाेख्या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन आयाेजकांच्या वतीने देण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.