आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरतीचा आग्रह:पदोन्नत्या रखडल्याने कृषी विभागात नाराजी ; मंत्र्यांवर अधिकाऱ्यांकडुन टीका

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी खात्यात जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी दर्जाची रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला मुहूर्त लागत नाही. पदोन्नतीही रखडल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मंत्र्यांकडून निर्णय घेतला जात नसल्याची टीकाही केली जात आहे. आघाडी सरकार असताना विरोधकांच्या टीकेला घाबरून बदल्या, पदोन्नती थांबल्या होत्या, असे म्हटले जात होते. आता िशंदे-फडणवीस सरकार येऊन पाच महिने उलटून गेले तरी परिस्थिती बदलली नाही. कृषी सहायक संघटनेने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना एक पत्र पाठवून कृषी सेवकांची भरती करण्याचा आग्रह धरला आहे. राज्यातील ११ हजार ५९७ पदे मंजूर आहेत. पण अनेकांना पदोन्नत्या मिळाल्या असल्याने ही पदे पुन्हा रिक्त झाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...