आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Displeasure Over The Nomination Of 'MVIP' In The Electoral Transformation Panel; In A Dramatic Incident, The Addresses Of Former MLAs Were Hacked

'मविप्र'ची निवडणूक:परिवर्तन पॅनलमध्ये उमेदवारीवरून नाराजीचा सूर; नाट्यमय घडामाेडीत माजी आमदारांचे पत्ते कट

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्यामुळे परिवर्तन पॅनलमध्ये उमेदवारीवरून नाराजीचे सुर उमटले तर सत्ताधारी प्रगती पॅनलने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करीत विद्यमान अध्यक्षांसह कसमादेतील बहुचर्चित नेत्यांची तालुकास्तरावरील पदावर बोळवण करीत कात्रजचा घाट दाखवला.

निवडणुकीत दोन्ही पॅनलकडून प्रत्येकी 21 याप्रमाणे 42 उमेदवार जाहीर करण्यात आले. प्रगती पॅनलने विद्यमान अध्यक्ष तुषार शेवाळे यांचीच उमेदवारी कट करून चिटणीस डाॅ सुनील ढिकले यांना चाल दिली. त्यामुळे ढिकले विरूद्ध आमदार माणिकराव कोकाटे अशी लढत होईल. शेवाळे यांना चिटणीसपदाबरोबरच मालेगाव तालुक्यातील पदावरही स्थान न दिल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली.

उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‌ॅड. रविंद्र पगार यांना परिवर्तन पॅनल संधी देईल असे वाटत असताना विश्वासराव मोरे यांना बढती दिली गेली. त्यामुळे शरद पवार यांचे खास दुत अशी प्रतिमा असलेल्या पगारांना धक्का बसला. प्रगती पॅनलकडून यंदा जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर यांना मोठी संधी मिळेल असे वातावरण होते. प्रत्यक्षात, त्यांना देवळ्याच्या पदावर उमेदवारी दिल्यामुळे अनेकांना शाॅक लागला.

कोकाटे यांना ‘ताप’ ; अनुपस्थितीमुळे चर्चा

आमदार कोकाटे यांच्या अनुपस्थितीबाबतही खमंग चर्चा होती. सिन्नरमधून त्यांचे कट्टर समर्थक राजेंद्र चव्हाणके यांना संधी न देता कृष्णा भगत यांना चाल दिल्यामुळे ते नाराज झाल्याचे बोलले जात होते. दरम्यान, त्यांना ताप असल्यामुळे ते उपस्थित नव्हते असाही खुलासा केला जात होता.

ठाकरे-कोतवालांमध्ये वादाची ठिणगी

चांदवड तालुक्याच्या जागेवर माजी आमदार शिरीष कोतवाल यांना परिवर्तन पॅनलकडून संधी दिली जाईल असे चित्र होते. त्यासाठी त्यांचे एकेकाळचे शिष्य व सध्या विरोधक असलेल्या डाॅ आत्माराम कुंभार्ड यांनीही पाठींबा दिला होता मात्र कोतवाल, कुंभार्ड यांच्याएेवजी डाॅ सयाजी गायकवाड यांना संधी दिली गेल्यामुळे ठाकरे व कोतवालांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे चित्र आहे.

भाषण करणारेच गायब..

या निवडणुकीत दोन्ही पॅनलकडून जाहीर सभेत आरोपांचे रान उठवणाऱ्यांचीच उमेदवारी कापली गेल्याचे चित्र आहे. कोतवाल, राजेंद्र डोखळे, पगार, शेवाळे अशा दोन्ही पॅनलमधील नेत्यांनी भाषणांनी सर्वांचे लक्ष वेधले होते.

बातम्या आणखी आहेत...