आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:100 कोटींचा हिशेब ‘वर्षा’ला मिळाला नाही म्हणून भांडण - खासदार किरीट सोमय्या

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वादग्रस्त सहायक पाेलिस निरीक्षक सचिन वाझे यांची नियुक्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केली हाेती. महिन्याला १०० काेटी रुपये मागणाऱ्या गृहमंत्र्यांचा ‘वर्षा’ला बराेबर हिशेब मिळाला नाही म्हणून हे भांडण झाले अाहे. हे माफियांचे सरकार असून वाझेंचे लाभार्थी काेण याचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल. त्यांनी चाेरीचा माल परत करावा, असे आवाहन भाजपचे माजी खासदार किरीट साेेमय्या यांनी पत्रकार परिषदेत केले.

नाशिक दाैऱ्यावर अालेल्या साेेमय्या यांनी जिल्हा रुग्णालय व मनपाच्या काेविड सेंटरच्या भेटीत सांगितले की, १५ जिल्हा रुग्णालयांत अाॅक्सिजन प्लँट सुरू करण्यासाठी केंद्राने १०० काेटी रुपयांचा निधी दिला तरी पाच महिने उलटूनही प्लँट सुरू नाही. जिल्हा रुग्णालयातही अशीच परिस्थिती अाहे. राज्यात १० दिवसांत ३० हजार ५३५ रुग्णांची वाढ झाली तरीही सरकारची भूमिका उदासीन अाहे. केंद्राने ७२ लाख व्हॅक्सिन पाठवल्या असून फक्त ४० लाख लसीकरण झाले. गृहमंत्री म्हणतात परमबीर बदमाश अाहेत, तर सामनातून परमबीरचे कौतुक करून गृहमंत्री बदमाश असल्याचे सांगितले जाते. मुळात मुख्यमंत्री कार्यालयातून अनिल परब यांच्या माध्यमातून गृहमंत्रालयाचा कारभार चालवला जात असल्याचा अाराेपही विखे - पाटील यांनी यावेळी केला.

चाेरीचा माल परत करा
मी अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस अाणली. त्यामुळे संजय राऊत यांनी ५५ लाख परत केले. अडसूळ यांनीही १ काेटी रुपये घेतले अाहे. प्रताप सरनाईक या घाेटाेळेबहाद्दरांना चाेरीचा माल परत करावा लागेल. १०० काेटींच्या मागणीबाबत शरद पवार यांना माहीत नाही हे मानायला राज्यातील जनता तयार नाही. पवारांसह ठाकरेंकडे सर्व अधिकार असून त्यांनी परमबीर यांची हकालपट्टी का केली नाही? असा प्रश्नही त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...