आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:पैशांचा वाद; महिलेचा विनयभंग

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सासऱ्याने घेतलेल्या पैशांच्या वादातून दोघांनी घरात घुसून सासऱ्यांना शिवीगाळ करत सुनेचा विनयभंग केल्याचा प्रकार औरंगाबाद रोडवर उघडकीस आला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित निखिल अशोक शहा, हर्षद कृष्णा केसेकर (रा. संगमनेर) हे दोघे रात्री घरी आले. सासऱ्यासोबत असलेल्या पैशांच्या जुन्या वादातून त्यांनी कुरापत काढली. पीडित विवाहिता भांडण सोडवण्यास गेली असता संशयितांनी तिचा विनयभंग केला. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...