आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारण:थर्माेफ्युरी हिटिंग चेंबरमधील गडबड हेच स्फाेटाचे कारण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

थर्माेफ्युरी हिटिंग चेंबरमधील गडबड हे जिंदाल कंपनीतील भीषण स्फाेटामागील कारण असल्याची दाट शक्यता अग्निसुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे.कंपनीच्या ज्या विभागात हा स्फाेट झाला तेथे पाॅलिफिल्म्सचा टाकाऊ माल वितळवला जाताे, त्यासाठी थर्माेफाइड हिटिंग चेंबरचा वापर केला जाताे, याच्या पाइप्समध्ये गरम आॅइल वाहत असते.

येथे माल वितळल्यानंतर त्याचे रुपांतर ग्रॅन्युअल्स (कच्चा माल) मध्ये हाेते. त्यानंतर पुन्हा त्यापासून फिल्म बनविल्या जातात. आॅइल बर्नरचे काम करणाऱ्या याच थर्माेफाइड हिटिंग चेंबरमध्ये झालेली गडबड घटनेचे प्रमुख कारण असू शकते अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

एनडीआरएफ,एसडीआरएफ टीम परतल्या माघारी: कंपनीतील आग कमी झाल्यानंतर प्रथम पुणे आणि अंधेरी येथून आलेल्या एनडीआरफच्या टीम परतल्या. त्यानंतर मंगळवारी धुळ्याची एसडीआरएफची टीमही परतल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी सांगितले.

सुरक्षा मानके पायदळी
घटनास्थळावर भेट दिलेल्या या क्षेत्रातील जाणकारांच्या मते कंपनीत कच्चा व तयार माल अस्ताव्यस्त हाेताच शिवाय सुरक्षा मानके सर्रास पायदळी तुडविण्यात आली हाेती. अशा दुर्घटनेनंतर जाे अॅान साइड प्लॅन असावा ताेही नव्हता. दरम्यान, या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या माहितीसाठी संपर्क क्रमांक
दुर्घटनेदरम्यान कंपनीत उपस्थित परंतु अद्यापही संपर्क न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी संबंधित बेपत्ता कर्मचाऱ्याच्या तपशिलासह इगतपुरी तहसील कार्यालयाच्या 02553-2440009 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...