आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:जि. प. कर्मचारी पतसंस्था सभासदांचा सहकार वर विश्वास

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१० वर्षांपासून संचालक मंडळाची अविराेध निवड हाेणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची काही सदस्यांच्या हट्टामुळे या पंचवार्षिकमध्ये निवडणूक घेण्यात आली. यात सत्ताधारी‘आपला’ पॅनलच्या उमेदवारांचा धुव्वा उडवत सभासदांनी ‘सहकार’ पॅनलवर विश्वास दाखवत संपूर्ण उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली.

१४६७ पैकी ११४३ सभासदांनी मतदान केले.जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक दाेन पंचवार्षिक पासून अविराेध करण्यात येत हाेती.

आराेग्य व अभियंता विभागामुळे बसला फटका
आम्ही सर्व संवर्गाच्या लाेकांना साेबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अभियंता व आराेग्य विभागाचा आमच्याकडे उमेदवार नव्हता. त्याचाच आम्हाला माेठा फटका बसला आहे.- विजयकुमार हळदे, नेते आपला पॅनल

मनमानी कारभाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या विद्यमान संचालकांचा मनमानी कारभार सुरू हाेता. कर्मचाऱ्यांना दमबाजी केली जात हाेती. त्याची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे.- प्रमाेद निरगुडे, नेते सहकार पॅनल

हे आहेत विजयी उमेदवार
सर्वसाधारण गट - सचिन अत्रे, अमित आडके, रवींद्र थेटे, रंजन थाेरमिसे, नितीन पवार, चंद्रशेखर पाटील, सचिन पाटील
तालुका प्रतिनिधी - किशाेर अहिरे, गणेश गायकवाड, नंदकिशाेेर साेनवणे
इतर मागासवर्ग - विक्रम पिंगळे,
भटक्या जाती जमाती - अनिल दराडे, अनुसूचित जाती जमाती - मंगेश जगताप
महिला प्रतिनिधी - अर्चना वसंत गांगाेडे, सरिता नानाजी पानसरे (खैरे)

बातम्या आणखी आहेत...