आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमआयडीसीकडून सिन्नर औद्याेगिक क्षेत्रालगत ३९१ एकर जमीन अधिसूचित केली गेली, त्यापैकी २३४.९५ एकर संपादन केली गेली. त्यापैकी, ४२ एकर खाेल दरी असल्याने उद्याेगांना वितरीत करता येत नसल्याचे समाेर आले हाेते. याप्रकरणी तत्कालीन संबंंधित अधिकाऱ्यांची चाैकशी सुरू आहे. मात्र, या चाैकशीमुळे उद्याेगांचा विकास थांबला असल्याने दरीव्यतिरिक्त उर्वरित क्षेत्र उद्याेगांसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी उद्याेजकांनी आयमाच्या नेतृत्वात एमआयडीसीच्या वरिष्ठांकडे केली आहे.
..असे आहे प्रकरण सिन्नरच्या माळेगाव आैद्याेगिक वसाहतीत उद्याेगांसाठी भूसंपादन प्रक्रिया राबविली गेली. याकरिता ३९१ एकर जमीन अधिसूचित केली, त्यापैकी २३४.९५ एकर अधिसूचितही केली गेली. त्यापैकी, ४२ एकर जमीन ही थेट दरी असून यापाेटी संबंधितांना रक्कमही अदा करण्यात आली. उद्याेगांना येथे भूखंड दिले जाऊ शकत नसल्याने ही प्रक्रिया संशयाच्या भाेवऱ्यात आहे. तत्कालीन सर्वेअर, तत्कालीन जबाबदार अधिकाऱ्यांची याप्रकरणी चाैकशी सुरू आहे. यातील काही अधिकारी सेवानिवृत्त झाले असून काही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. याप्रकरणी संबंधितांवर नेमकी काय कारवाई हाेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.