आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी‎ इम्पॅक्ट‎:दीड वर्षापासून प्रलंबित तब्बल 1000‎ रेशनकार्डांचे आठवडाभरात वितरण‎

नाशिक‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पुरवठा विभागाला रेशनकार्ड‎ उपलब्ध होत नसल्याचे कारणे देत‎ गेल्या दिड वर्षापासून विविध महा ई‎ सेवा केंद्रातील दोन हजारांवर‎ रेशनकार्डचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात‎ आले होते. तसेच, अनेक अर्ज गहाळ‎ झाल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने डीबी‎ स्टारच्या माध्यमातून २४ फेब्रुवारीला‎ प्रसिद्ध केले हाेते. त्यानंतर प्रशासनाला‎ जाग येत पुरवठा विभागाने‎ आठवडाभरात एक हजारावर‎ रेशनकार्डचे वितरण केल्याची माहिती‎‎‎‎‎ धान्य वितरण अधिकारी नितिन गर्जे‎ यांनी दिली.‎ रेशनकार्डचे अर्ज गहाळ व कोऱ्या‎ रेशनकार्डाचा तुटवडा निर्माण झाल्याने‎ नागरिकांना रोज या कार्यालयात फेऱ्या‎ माराव्या लागत हाेत्या.

नविन रेशनकार्ड‎ काढण्यासाठी तसेच, रेशनकार्ड‎ हरवले किंवा खराब झाले असेल तर‎ नविन रेशनकार्डसाठी पुरवठा‎ कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो.‎‎‎‎‎ जिल्हाभरातील सुमारे तीन हजार‎ नागरिकांनी नविन रेशनकार्डसाठी‎ अर्ज केलेला होता. तसेच, अनेक‎ नविन अर्जदारांनाच रेशनकार्ड मिळत‎ नसल्याचे चित्र अजूनही आहे.‎ अनेकांना अर्ज गहाळ झाल्याचे ही‎ उत्तर मिळत होते. तसेच, काहींची‎ रेशनकार्डाची प्रक्रिया पूर्ण होऊनही‎ ग्राहकांना रेशनकार्ड मिळत‎ नसल्याची तक्रार होती.‎

रेशनकार्डचे काही अर्ज सापडत‎ नव्हते तर काही प्रलंबित होते.दैनिक‎ दिव्य मराठीत यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध‎ झाल्यानंतर सपूर्ण अर्जाची माहिती‎ घेऊन प्रलंबित अर्ज निकाली‎ काढण्यात आले.तसेच,अर्जदारांना‎ फोन करून बोलून रेशनकार्डांचे‎ वितरण करण्यात आले आहे. -‎ नितीन गर्जे, धान्य वितरण‎ अधिकारी‎

बातम्या आणखी आहेत...