आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासगुणा महिला मंच व सगुणा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संस्थेच्या दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त कार्मक्षम महिला पुरस्काराचे वितरण करण्यात आले. द्वारका येथील पी.डी. गांगुर्डे सांस्कृतिक भवनमध्ये हा कार्यक्रम झाला.
संस्थेच्या वतीने सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनिय व सामाजिक काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शोभा वसंत गिते, मिस इंडिया इंटरनॅशनल पलक हितेश नय्यर,मराठी अभिनेत्री पूनम पाटील, माजी नगरसेविका अर्चना थोरात यांच्याहस्ते महिलांना सगुणा कर्तबगार महिला मंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पलक हितेश नय्यर यांनी महिलांनी आत्मनिर्भर बनावे, कलाक्षेत्रात आपले नाव कोरून सांस्कृतिक चळवळ खोलवर रुजवावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शोभा गिते यांनी विविध क्षेत्रात महिलांनी नाव संपादित केले असल्याने महिला खऱ्या अर्थाने अष्टपैलू झाल्या असल्याचे सांगितले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अध्यक्षा छायाताई गवांदे, उपाध्यक्षा प्रवज्जा गांगुर्डे, सेक्रेटरी मनीषा काळे, रुचा गांगुर्डे, सारिखा कटारे, यांनी परिश्रम घेतले.
यांना मिळाला पुरस्कार
डॉ. सोनाली काळे, डॉ. वर्षा ठाकरे, डॉ. शिल्पा काविष्कार, डॉ. निष्ठा पालेजा, डॉ. दीपिका मुंदडा, डॉ. तृप्ती राहुल दाण तसेच मोहिनी हर्षल गुंजाळ, सोनाली अहिरराव, कुंदा प्रकाश सोनवणे, माजी नगरसेविका अश्विनी बोरस्ते, वंदना अरुण कोल्हे, अनिता भांबरे, प्रतिभा मस्के, मनीषा नीलेश लूनावत, अरुणा शिरसाट, सुजाता केदार, भारती शेलार, सारिका जाधव, तस्निम मारू, लीलाबाई सोनवणे, लता वाघ, भारती पाटील, हेमा चौरसिया, संध्या कुलकर्णी, आशा गोवर्धने, माया सोनने, सविता चतुर, पुष्पा काळे, सरला देवरे, शिरीन मुल्ला, प्रियंका शिनकर, नेहा चव्हाण, अश्विनी आहेर, सीमी मंडलिक, प्रिया केळकर, अंजली उगले, अश्विनी घाणेकर, योगिता मोरे, विजया पगारे, वंदना बैसाने यांना पुरस्कार देण्यात आला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.