आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्त जन्मोत्सव:भगूरसह देवळालीमध्ये दत्त जयंतीनिमित्त महाप्रसाद वाटप

देवळाली कॅम्प4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दत्त जन्मोत्सवानिमित्त भगूर व देवळाली कॅम्प परिसरामध्ये भाविकांनी पूजा, अभिषेक य महाप्रसाद वाटप करत जयंती उत्सहात साजरी करण्यात आली.दत्त जन्मोत्सवानिमित्त शहरातील खंडोबा टेकडी येथे दत्त मंदिरात अन्नाज टेम्पल हिल ग्रुप व खंडोबा मंदिर विश्वस्त यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांचे हस्ते तर येथील पोलिस स्टेशन येथील दत्त मंदिरात वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

मस्जिद स्ट्रीटवरील दत्त मंदिरात सकाळी राजु यादव यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी रोहीत गोडसे, कैलास कांडेकर, बाळू ऑटे, राकेश पगारे, नीलेश यादव आदीसह भक्त परिवार प्रयत्नशील होते.

वडनेरोड येथील गुरूनानी प्लाझा च्या मागे साई मंदिरात माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे, किरण कोटियन, गोकुळ मोजाड यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दुपारी पूजा अभिषेक व महाप्रसाद वाटप करण्यात आला.

भगूर येथील दत्त मंदिरात दत्त मित्र मंडळातर्फे पूजा दरवर्षीप्रमाणे अभिषेक आयोगांच्या हस्ते करण्यात आले दर्शन करण्यासाठीं भाविकांनी गर्दी केली होती व सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रदीप फोकणे, राजेंद्र मुसळे, सुनील करंजकर, सुनील जोरे, मयूर जाधव, प्रथमेश मोजाड, आकाश म्हासळे, मल्हारी बांड, योगेश करंजकर, भूषण करंजकर, विकी गवारे, सागर काळे, गौरव करंजकर, साहिल मुसळे, धनेश खापेकर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या सर्व सदस्ययांचे विशेष प्रयत्न झाले.

बातम्या आणखी आहेत...