आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:पेठे विद्यालयात शिष्यवृत्तीचे  वितरण ; विद्यार्थ्याने बासरीवादनाद्वारे गणेशवंदना केली सादर

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाएसाेच्या पेठे विद्यालयात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कै. अंजनीबाई मैंद यांच्या १९४४ साली ठेवलेल्या ठेवीतून शिष्यवृत्तीचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शिल्पा अंतापुरकर, आशिष अंतापूरकर, जितेंद्र विसपुते, मंजिरी विसपुते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक कैलास पाटील यांनी केले. याप्रसंगी तेजस बागूल, दुर्वेश नाशिककर, पुष्कर वाघ, अथर्व दुसाने, कुणाल सोनार, प्रतीक सोनार आदी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीने गौरविण्यात आले. कुणाल सोनार या विद्यार्थ्याने बासरीवादनाद्वारे गणेशवंदना सादर केली.

व्यासपीठावर मुख्याध्यापक कैलास पाटील, उपमुख्याध्यापिका संगीता थोरात, शिक्षक प्रतिनिधी शैलेश पाटोळे आदी होते. सूत्रसंचालन सोनाली चिंचोले यांनी केले. उपमुख्याध्यापिका संगीता थोरात यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...