आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील संचालक मंडळांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब पाटील यांच्या काळात जिल्ह्यातील दिग्गज नेते मंडळींचा समावेश असलेल्या २७ सदस्यांचे संचालक मंडळ असलेल्या बँकेत १२०० कोटी पेक्षा अधिक आर्थिक गैरव्यवहार झाले असल्याची तक्रार बॅंकेच्यात माजी कर्मचाऱ्याने दिल्यानंतर बॅंकेची चाैकशी सुरू झाली आहे. सहकार आयुक्त ज्ञानदेव मुकणे यांनी याकरीताचे आदेश दिल्यानंतर ही चाैकशी सुरू झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
या संचालकांच्या काळात बँकेच्या 215 शाखा 7 विभागीय कार्यालयांचे अनावश्यक नूतनीकरण, फर्निचर, स्टेशनरी, संगणक खरेदी, तिजोऱ्या खरेदी, बंदुकधारी सुरक्षारक्षकांची नेमणूक, काेणतीही प्रक्रिया न पाळता तसेच बिंदुनामावलीचे उल्लंघन करून केलेली 430 कर्मचाऱ्यांनी नोकर भरती या बहुचर्चित ठरलेल्या विषयांवर कलम 88 अन्वये चाैकशी हाेऊन संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती झाली. परंतु तत्कालीन एका स्थानिक आमदाराने पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री यांची दिशाभूल करून न्यायालयात याचिका दाखल करू दिली नाही.
त्यामुळे संबंधितांना न्यायालयातून स्थगिती मिळाली. यानंतर केदा आहेर यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले. परंतु त्यांना बँकेचे धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना त्यांनी निर्णय घेऊन अनियमित व बेकायदेशीर कामकाज केल्याचे तक्रारदार माजी कर्मचारी भरत गाेसावी यांसह भाऊसाहेब गडाख यांचे म्हणणे आहे.
आदेश देणारे मुकणेही बॅंकेवर हाेते प्रशासक
दरम्यान या चाैकशीचे आदेश अपर सहकार विभागाचे अपर आयुक्त व विशेष निबंधक ज्ञानदेव मुकणे यांनी दिले आहे. विशेष म्हणजे, मुकणे यांनीही जिल्हा बॅंकेचा कारभार जवळून पाहीला असून त्यांनी बॅंकेवर प्रशासक म्हणून कामकाज पाहीले आहे. बॅंकेतून त्यांचे जाणे अनेकांना चटका लावून जाणारे ठरले हाेते. त्यामुळे या चाैकशीतून काय समाेर येते हे पहाणे औत्सुक्याचे देखिल ठरणार असल्याची चर्चा बॅंकेच्या वर्तुळात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.