आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरूषांचा अवमानजनक उल्लेख करून महाराष्ट्रातील पुरोगामी जनतेचा अपमान केला आहे. संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करून मंत्रीपदाची घेतलेल्या शपथेचेही उल्लंघन केले आहे. या कारणास्तव चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्यावतीने करण्यात आली आहे.
जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, प्रदेश सरचिटणीस सुरेश मारू यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, नाशिक यांना निवेदन देऊन सदरची मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील फडणवीस शिंदे सरकारमधील त्यांचे सहकारी वेळोवेळी महाराष्ट्रातील महापुरूषांचा अवमान करून सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे, ही बाब महाराष्ट्रातील जनतेसाठी घातक आहे. असेही मत प्रसारमाध्यमांशी बोलतांना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस मनोहर आहिरे, अशोक शेंडगे, कुसुमताई चव्हाण, स्वाती जाधव, उषाताई साळवे, कल्पना पांडे, इसाक कुरेशी, अरूण दोंदे, सुदेश मोरे, तुळशीराम जाधव, संतोष हिवाळे, प्रविण काटे, अमोल मरसाळे, ॲड. विकास पाथरे,ॲड. सुमित चोपडे, गोरख साळवे, देवेन मारू, कमलेश चव्हाण, निलेश धारीया, दिनेश चव्हाण, जम राठोड, दिनेश मारू, भावेश चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यातील शिंदे सरकार व भाजपाच्या मंत्र्यांच्या कडून वारंवार पुरस्कार राज्यात शांतता पसरवण्याचा देखील प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच मंत्री आधार कार्ड दादा पाटील यांच्या विरोधात घोषणा देत त्यांचा निषेध नोंदविण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.