आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेची आत्महत्या ; गुरुवारी तारवालानगरात हा  प्रकार उघडकीस आला

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेने घरी गळफास घेत आत्महत्या केली. गुरुवारी तारवालानगरात हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शीतल अरविंद सरोदे (३८, रा. गोकुळ सोसायटी, तारवालानगर, दिंडोरीरोड) यांनी राहत्या घरी पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या भावाच्या लक्षात हा प्रकार आला. सिव्हिलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सरोदे या सिव्हिलमध्ये अतिदक्षता विभागात कार्यरत होत्या. मागील वर्षी त्यांची मालेगावला बदली झाली होती. मात्र त्या तेथे हजर झाल्या नव्हत्या. बदलीसाठी त्या प्रयत्नशील होत्या. बदली न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच सहकारी परिचारिकांनी रुग्णालयात धाव घेतली. मनमिळावू व कामात तत्पर असलेल्या परिचारिकेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...