आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरु कप हॉकी स्पर्धेचे आयोजन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी स्पर्धेत सहभागी हाेण्यासाठी 3 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी केले आहे.
जवाहरलाल नेहरू हॉकी टुर्नामेंट सोसायटीच्या वतीने 2022-23 या वर्षाकरीता राष्ट्रीय ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरू कप हॉकी स्पर्धेचे आयोजन 1 ते 28 सप्टेंबर या कालावधीत शिवाजी स्टेडियम नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यापूर्वी जिल्हा, विभाग व राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन करावे लागणार आहे.
हॉकी स्पर्धेचे आयोजन
त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील सब ज्युनिअर 15 वर्षाखालील मुले व ज्युनिअर 17 वर्षाखालील मुले-मुली या गटामध्ये नेहरू कप हॉकी स्पर्धेचे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 15 वर्षाखालील खेळाडू हा 1 नोव्हेंबर 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच ज्युनिअर गट 17 वर्षाखालील मुले व मुली खेळाडू हे 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यांनतर जन्मलेले असावेत. ज्या संघाची नोंदणी व प्रवेशिका यादी दिलेल्या मुदतीत कार्यालयात सादर करण्यात येणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.