आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिशुविहार व बालक मंदिर( मराठी माध्यम ) भोसला या शाळेतर्फे दिवाकरजी कुलकर्णी यांच्या स्मृती प्रित्यर्थ इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय लंगडी स्पर्धा गुरुवार दिनांक 15 डिसेंबर व 16 डिसेंबर रोजी विद्या प्रबोधिनी प्रशाला शाळेच्या क्रीडांगणावर घेण्यात आल्या.
प्रमुख अतिथी म्हणून शालेय समिती अध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्याध्यापिका नीता पाटील समन्वयक स्वाती गडाख उपस्थित होत्या.
स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी झाले होते. त्यापैकी मुलांच्या गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय व मुलींच्या गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तम संरक्षक व उत्तम आक्रमक अशी बक्षिसे काढण्यात आली. मुलांच्या गटात प्रथम क्रमांक शिशुविहार व बालक मंदिर मराठी माध्यम यांनी पटकावला, द्वितीय क्रमांक अभिनव बालविकास मंदिर गंगापूर रोड व तृतीय क्रमांक अभिनव बालविकास मंदिर उत्तम नगर या शाळांनी पटकावला मुलींच्या गटातून प्रथम क्रमांक अभिनव बालविकास मंदिर उत्तम नगर , द्वितीय क्रमांक माधवराव लेले विद्यालय व तृतीय क्रमांक स्वर्गीय प्रभाकर वैशंपायन कामटवाडे या शाळेने पटकावला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
प्रथम क्रमांकासाठी एक हजार एक रुपये स्मृतीचिन्ह व प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सर्टिफिकेट , द्वितीय क्रमांकासाठी सातशे रुपये स्मृतीचिन्, प्रशस्तीपत्र तृतीय क्रमांक पाचशे रुपये स्मृतीचिन्ह स्वरूप होते . स्पर्धेचे नियोजन शैलजा पाटील यांनी केले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मनीषा इनामदार , भाग्यश्री पाटोळे व मनीषा गामणे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
या स्पर्धांमध्ये नाशिक शहर व जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचे संघ सहभागी झाले होते या स्पर्धांमध्ये अतिशय योग्य नियोजन केल्याने स्पर्धा नियोजित वेळेत संपन्न झाल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धांना उस्फूर्तपणे मोठ्या संख्येने संघ सहभागी झाल्याने प्रतिसाद लाभला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.