आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामीनाताई ठाकरे स्टेडियम मध्ये पार पडलेल्या 14 आणि 17 वर्षाखालील मुले आणि मुलींच्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धात द्वारका येथील एमएसबी विद्यालयाच्या संघाने चार सुवर्ण पदकांची कमाई करत स्पर्धेवर ठसा उमटवला. विशेष म्हणजे यात अत्यंत काट्याची स्पर्धा असलेल्या 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेतील दोन सुवर्णपदकांचा समावेश आहे.
सुमारे 100 शाळांमधील 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे या स्पर्धचे आयाेजन करण्यात आले हाेते.एमएसबी विद्यालयाच्या आदम पाटणवाला याने 14 वर्षाखालील मुलांच्या गटात गोळा फेक ,100 मीटर धावणे यात वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले तर 400 मीटर स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. याच गटातील 4 बाय 100 मीटर रिले प्रकाराचे भोसला विद्यालयाचा टाय ब्रेकर मध्ये पराभव करत सुवर्णपदक जिंकले.
पाटनवाला सह हातिम मुल्ला, हुसेन जीरापुरवाला आणि अब्देली हवेलीवाला यांचा या संघात समावेश होता.हातिम मुल्ला याने 200 मीटर धावणे प्रकारात कांस्यपदक, तर हुसेन जीरापूरवाला याने लांब उडी मध्ये कांस्यपदक मिळवले .याच गटातील मुलींमध्ये अरवा ट्रंकवाला हिने 100 आणि 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक मिळवले तर तिच्यासह हुसैना हमीद ,तसणीम नवाब, जुमाना उज्जैनवाला आणि जुमाना रतलामवाला यांच्या संघाने 4 बाय 100 मीटर रिले प्रकारात सुवर्णपदक मिळवले.
17 वर्षाखालील गटाच्या रिले मध्ये अलीअसगर बूटवाला, हैदर लोखंडवाला ,मोहम्मद राज आणि हुसेन ट्रंकवाला यांच्या संघाने रौप्य पदक मिळवले . रिले प्रकारातील सुवर्णपदक विजेते मुले आणि मुली तसेच वैयक्तिक गटातील सुवर्ण आणि रौप्य पदक विजेते खेळाडू विभागीय स्पर्धेत नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
प्रशिक्षक डॉ. गोकुळ काळे यांच्यासह सर्व खेळाडूंचा मुख्याध्यापिका मुनिरा इंदोरवाला आणि विद्यालयाचे मसूल अब्बास ईझी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. क्रीडा शिक्षक पराग भरते, कांचन कनोजिया दीक्षा लोहार आदि उपस्थित होते. राजेंद्र बच्छाव यांनी सुत्रसंचलन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.