आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात पहिल्यांदाच, नाशिकमध्ये जिल्हास्तरीय वारकरी स्नेहसंमेलनाचे आयाेजन करण्यात आले असून किमान 5 हजार वारकरी यात सहभागी हाेण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वारकरी, प्रबाेधनकार, प्रवचनकार, किर्तनकार यांच्या समस्यांवर या एकदिवसीय संमेलनात उहापाेह हाेइल.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ.भागवतराव कराड यांची प्रमुख उपस्थिती असेल तर अामदार श्रीकांत भारतीय हयांच्या उपस्थितीत संमेलनाचा सांगता समाराेह हाेइल.
पंचवटीतील श्रीराम सार्वजनिक वाचनालय पटांगण, गणेशवाडी येथे हे एक दिवसीय स्नेहसंमेलन हाेणार असून माजी आमदार बाळासाहेब सानप याचे स्वागताध्यक्ष आहेत. रविवारी 8 जानेवारी राेजी सकाळी 8 वाजता संमेलनाला प्रारंभ हाेइल.
पहिल्या सत्रात श्री संत तुकाराम महाराज विद्यार्थी गुरूकुल व वृध्दसेवा सदन नाशिकचे हरि किर्तन प्रवक्ते ह.भ.प.गंगाधर महाराज कवडे यांचे मार्गदर्शन हाेइल. यानंतर स्वागत समारंभ व त्यानंतर वारकरी गायक-वादक, गुणीजन तसेच दिंडी चालक-मालक यांच्या समस्या, शासकिय सुविधांबाबत चर्चासत्र हाेइल. दुपारी महाप्रसाद आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रात शहरातील वारकरी संप्रदायिक कार्यक्रमातील अडचणी, वारकरी प्रवचन, किर्तनकार, कथाकार यांच्या समस्या व त्यावर शासन दरबारी पाठपूरावा कसा करता येइल? यावर चर्चा तसेच प्रवासी सवलत व विमा शासकिय मानधन, वैद्यकिय उपचार, निवृत्ती वेतन, सवलती, वारकरी निवास भवन आदी विषयांवर मंथन केला जाणार आहे.
5 जणांचा गाैरव
या संमेलनात पहिल्यांदाच जिल्ह्यातील पाच निष्ठावंत वारकऱ्यांना वारकरी भुषण पुरस्काराने गाैरविले जाणार असल्याची माहीती स्वागताेत्सुक ह.भ.प. त्रंबकराव गायकवाड, ह.भ.प. पुंडलिकराव थेटे, ह.भ.प, सुरेश मगर, ह.भ.प. माणिकराव देशमुख, ह.भ.प. भरतानंद सांगळे यांनी दिली.
यांच्यावतीने संयुक्त आयोजन
श्रीराम सार्वजनिक वाचनालय पंचवटी नाशिक, संत ज्ञानेश्वर अभ्यासिका माय माऊली भजनी मंडळ तथा बहुउद्देश्य सेवाभावी संस्था कोणार्क नगर आणि श्री सीतामाई महिला वारकरी ट्रस्ट पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.