आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देखभाल-दुरुस्ती कागदावरच:जलतरण तलावांना अवकळा; माती, शेवाळ, कचरा साचला ; पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कानाडाेळा

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एरवी तपमान वाढत असताना शहरातील जलतरण तलावांत हौशी जलतरणपटूंची तुडुंब गर्दी बघावयास मिळत असे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधामुळे जलतरण तलाव वापरण्यास मनाई होती. जलतरण तलावांना त्यामुळे अवकळा प्राप्त झाली आहे. पालिकेला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देण्याला या जलतरण तलावांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याने जलतरण तलावाला थेट दलदलीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अनेकदा नागरिकांनी तसेच जलतरणपटूंनी याबाबत तक्रारी केल्या तरी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कोरोना निर्बंध उठल्यानंतरही जलतरण तलावांकडे झालेले दुर्लक्ष संतापजनक आहे.

महापालिका क्षेत्रात तब्बल सहा जलतरण तलाव आहे. या ठिकाणी नियमित सरावासाठी खेळाडू व हौशी जलतरणपटूंची नेहमीच गर्दी होत असे. उन्हाळ्यात तर जलतरण तलाव परिसरात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सरावासाठी रांगा लागत असे. याद्वारे पालिकेच्या तिजोरीत भरमसाठ रक्कम देखील जमा होत होती.मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जलतरण तलावाच्या वापराबाबत गेल्या दोन वर्षांपासून मनाई करण्यात आलेली आहे. नागरिकांकडून वापर होत असल्याने पालिकेच्यावतीने देखील या तलावाच्या देखभालीकडे कानाडोळा करण्यात आला आहे. परिणामी जलतरण तलावांत मोठया प्रमाणावर माती, शेवाळ, कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या प्रकारामुळे जलतरण तलावाच्या सुशोभिकरणासाठी तसेच नियमित केल्या जाणाऱ्या खर्चावर पाणी फिरले आहे. वाढत्या तक्रारी लक्षात घेता पालिकेने दखल घेत तातडीने जलतरण तलावाची स्वच्छता करावी, अशी मागणी जलतरणपटू करीत आहे.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा
शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अंत्यत महत्वपूर्ण असणाऱ्या जलतरण तलावांची दयनीय अवस्था झाली आहे. कोरोना बाधितांची संख्या घटल्याने शासनाच्या वतीने शहर निर्बंध मुक्त करण्यात आले आले. यामुळे दोन वर्षांनंतर जलतरण तलाव खुले होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. याचमुळे पालिकेच्या संबधित विभागाने याची दखल घेत जलतरण तलावाचा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...