आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदिरानगर भागातून वळविण्यात आलेली अवजड वाहनांची वाहतूक त्वरित अन्य मार्गाने वळवावी, अशी मागणी आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.द्वारका चाैकातील वाहतूक काेंडीची समस्या साेडविण्यासाठी पुणेरोडवरून येणारी अवजड वाहतूक वडाळा-पाथर्डी मार्गावरून इंदिरानगर भागातून वळविण्यात आली आहे. मात्र, अवजड वाहनांमुळे परिसरामध्ये वारंवार लहान-मोठे अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी गॅसचा टँकर उलटून अपघात झाला होता. तसेच दुसऱ्या अपघातात गॅसचा टँकर डिव्हायडरवर आदळला. ज्या मार्गाने अवजड वाहनांची वाहतूक होते, त्या परिसरात महाविद्यालय आणि शाळा आहेत.
त्यामुळे या मार्गावर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस व खासगी वाहने जातात. तसेच काही विद्यार्थी स्वत:च्या वाहनाने येतात. अशोका मार्ग, डीजीपीनगर ते वडाळा गाव, कलानगर शंभर फुटी रस्ता, पाथर्डी फाटा तसेच साईनाथनगर, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक या मार्गाने अवजड वाहतूक २४ तास होत असते. सदर वाहतूक अन्य मार्गाने वळविणे अत्यंत गरजेचे आहे. तसे न केल्यास मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे ही अवजड वाहतूक इतर मार्गाने वळविण्याची मागणी आ. देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन केली. याप्रसंगी पोलिस आयुक्तांनी तातडीने सर्व प्रश्नांची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले तसेच पोलिस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांना सदर मार्गाची पाहणी करण्याची सूचना केली. या शिष्टमंडळामध्ये माजी महापौर सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, चंद्रकांत खोडे, सुनील देसाई, ॲड. अजिंक्य साने, सुप्रिया खोडे, ॲड. श्याम बडोदे, शाहीन मिर्झा आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.