आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी स्पेशल मुलाखत:नाशिकचे गणपतीवाले मोरे कुटुंब: पर्यावरणपूरक गणपती साकारणारी चौथी पिढी मयूर मोरे यांच्याशी खास संवाद

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण घरच्या घरी साजरे करण्याची वेळ आली आहे. या निमित्ताने दिव्य मराठी तर्फे व्हर्चुअल विघ्नहर्ता गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. 'दिव्य मराठी'च्या 'विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळा'साठी गणपतीची ही मूर्ती नाशिकच्या मयूर मोरेंनी तयार केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उचित साधनांसह भक्तांना अश्वस्त करणाऱ्या या अनोख्या बाप्पाच्या अनोख्या संकल्पनेबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत मुर्तीकार मयूर मोरे. दिव्य मराठीचे नाशिक आवृत्तीचे संपादक जयप्रकाश पवार, डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी, दीप्ती राउत आणि पीयूष नाशिककर यांनी त्यांच्या घरी जाउन संवाद साधला.

मयुर मोरे हे 'गणपतीवाले मोरे' कुटुंबातील चौथी पिढी आहे. त्यांचे वडील, आजोबा आणि पणजोबा सुद्धा पारंपारिक पद्धतीने गणपतीची मूर्ती साकारण्याचे काम करत होते. मात्र, मयुर यांनी जेजे कॉलेज ऑफ आर्ट्समधून याचे पद्व्युत्तर शिक्षणच घेतले. त्यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही भावांनी सुद्धा याचे प्रशिक्षण घेतले आहे. याच प्रशिक्षणातून ते इतरांना शिकवतात आणि सोबतच वेग-वेगळे प्रयोग सुद्धा करतात.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser