आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकचे हवामान, संस्कृती चांगली आहेच, त्यासोबतच आपण उड्डाणपूल, मुंबई, पुणे, धुळे, औरंगाबाद या शहरांकरिता बांधलेले चारपदरी रस्ते, विमानतळ इमारत या सगळ्यांमुळे शहराची कनेक्टिव्हिटी उत्तम तयार झाली आहे. मनोरंजनासाठी बोटक्लबसारखे अनेक प्रकल्प तर शहराच्या चारही बाजूने रिंगरोडचे जाळे, उत्तम आरोग्य सुविधा, मोठ्या ब्रॅण्डची हॉटेल, शाळा, कॉलेजेस, मॉल्स यांसारख्या उत्तम सुविधा यामुळे नवे उद्योग नाशिककडे आकर्षिले जात असून नाशिक हेच त्यांच्याकरिता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे. ‘दिव्य मराठी’च्या प्रॉपर्टी एक्स्पोतून हजारावर गृहप्रकल्प एका छताखाली उपलब्ध करून दिले असून हा एक्स्पो म्हणजे, घर खरेदी करू इच्छिणारा आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातील मोठा दुवा ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
शहरातील गोविंदनगर बोगद्याजवळील मनोहर गार्डन येथे आयोजित ‘दिव्य मराठी’च्या प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवारी भुजबळ यांच्या हस्ते हवेत फुगे सोडत झाले तेव्हा ते मार्गदर्शन करत होते. व्यासपीठावर महापालिका आयुक्त कैलास जाधव, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार, युनिट हेड जुबेर मलिक, दीपक बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सचे प्रमुख दीपक चंदे, ललित रुंग्टा ग्रुपचे अभिषेक बुवा, पीएनबी नाशिकचे बिझनेस हेड सचिन मिस्तरी होते
श्रीरामदेखील नाशिकमध्ये वास्तव्यास होते हे सांगताना आजही लोक नाशिककडे आकर्षित होत असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. मुंबई, पुण्यात बिल्डर्सबाबत अनेक तक्रारी असतात, मात्र सुदैवाने नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांनी तसे घडू दिलेले नाही, क्रेडाईच्या माध्यमातून हे घडत आहे. प्रामाणिकपणे हे व्यावसायिक काम करीत असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. गेल्या युनिफाइड डीसीपीआर उत्तमप्रकारे महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केला. यातून बऱ्यापैकी अडचणी दूर झाल्या आहेत. परंतु, तितकीच जबाबदारी रिअल इस्टेट क्षेत्रावर पडलेली असून चांगल्या प्रकारचे बांधकाम करावे लागणार आहे. शहराचे आपण रचनाकार आहोत हे लक्षात ठेवून काम करायचे असल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन यावेळी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.