आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना महामारीच्या जागतिक संकटात शाळा बंद असताना कुठे ऑनलाइनच्या माध्यमातून, तर कुठे ऑनलाइनचे अडथळे पार करत विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे यशस्वी प्रयोग करणाऱ्या राज्यभरातील ४० शिक्षकांना “दिव्य मराठी’च्या वतीने “कोरोना गुरुवंदना’ या विशेष सोहळ्यात गौरवण्यात आले. हा आॅनलाइन गाैरव सोहळा सुरू आहे. सोहळ्यात शिक्षण क्षेत्रातील ख्यातकीर्त विचारवंत आणि एमकेसीएल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. विवेक सावंत प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी उदय पंचपोर, मुख्य व्यवस्थापक डाॅ. रेवती नामजोशी, ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांच्यासह मान्यवर सहभागी झाले आहेत.
राज्यातील शाळा बंद असल्या तरी शैक्षणिक वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास पोहोचवण्याचे आव्हान राज्यातील शिक्षकांपुढे होते. या पार्श्वभूमीवर अनेक शिक्षकांनी सुरू केलेल्या ऑनलाइन, ऑफलाइन प्रयोगांना यंदाच्या गणेशोत्सव निमित्ताने दिव्य मराठीने “शिक्षणाचा श्रीगणेशा’ या वृत्त मालिकेतून सर्वदूर पोहोचवले. त्यांच्या या प्रयोगांची दखल घेतली जावी, या उद्देशाने शिक्षक दिनाच्या निमित्ताने हा विशेष सोहळा होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.