आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईवर दिव्य मराठीची गुढी, कोरोनाची दरी मिटवून, विश्वासाची गुढी उंच उभारू

nashik6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ...अखेर शिखर सर केलेच मध्यरात्रीचा थरार

कळसुबाई. राज्यातील सर्वोच्च शिखर. बारी (ता. अकोले, जि.नगर) हे कळसुबाईच्या पायथ्याचे ११०० लोकवस्तीचे गाव. कळसुबाई शिखर सर करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवरच गावची अर्थव्यवस्था अवलंबून. कोरोनाच्या विळख्याने गावचे अर्थचक्र बंद पडले. याप्रसंगी न डगमगता, कोरोनाचे संकट दूर करण्याच्या निर्धाराने ग्रामस्थांनी कळसुबाईवर विश्वासाची गुढी उभी केली...सोबतीला होती दिव्य मराठीची टीम.

...अखेर शिखर सर केलेच मध्यरात्रीचा थरार
त्या दिवशी सायंकाळी साडेचार वाजता आम्ही कळसुबाईच्या पायथ्याशी पोहोचलो. पायथ्याशी असलेल्या बारी गावचे सरपंच तुकाराम खाडे यांना बरोबर घेतले. लगेच शिखर सर करायला सुरुवात केली. वाटेने जाताना सरपंचांना येण्याचा हेतू सांगितला. शिखराची पहिली चढण चढल्यानंतर आम्ही प्रचंड थकलो. आमची अवस्था पाहून सरपंचांनी सांगितले की शिखरावर पोहोचेपर्यंत अंधार होईल. फोटो मिळणार नाहीत. कारण शिखरावर पोहोचण्यास ३ तास तरी लागतात. मग आम्ही मध्यरात्री शिखराकडे कूच करायचे ठरवले. मध्यरात्री ३ वाजता शिखर पादाक्रांत करण्यास निघालो. सोबत सरपंच, ग्रामस्थ मंडळी. किर्र अंधार, समोर खडा पहाड, आजूबाजूला घनदाट जंगल, हिंस्र श्वापदांची भीती ( आदल्या रात्रीच बिबट्याने एका जोडप्यावर हल्ला केला होता) त्यामुळे अत्यंत धास्तावलेल्या मन:स्थितीत, पण शिखर सर करायचेच व वाचकांना सर्वोच्च शिखरावरून महाराष्ट्र दर्शन घडवायचेच या मानसिकतेतून चढाईस सुरुवात केली. बॅटरीच्या उजेडात अत्यंत धोकादायक चढणी, खाचखळगे, चिंचोळ्या वाटा, कधी एका बाजूला दरी...अशा मार्गाने अनेक विसावे घेत, पावणेचार तासांनी आम्ही शिखर सर केलेच.

कळसुबाई शिखर सर करणारी दिव्य मराठी टीम अजय कुलकर्णी, विजय पोखरकर, गजानन दौड, रवी खंडाळकर

0