आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा भालेराव यांना दिव्यांग सेवा पुरस्कार:'नॅब’ कडून अंध-अपंगांना व्हीलचेअर; काठीचे वाटप

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल असाेसिएशन फाॅर ब्लाईंड (नॅब) च्या वतीने राज्यस्तरीय दिव्यांग सेवा पुरस्कार आणि लुई ब्रेल दिन साजरा करण्यात आला. यावेळी पूजा भालेराव यांना 'दिव्यांग सेवा पुरस्कार' देऊन गुरुवार 5 जानेवारीला गौरविण्यात आले. तसेच अंध अपंग यांना व्हीलचेअर, काळा चष्मा, काठीचे वाटप करण्यात आले. अंध विद्यार्थ्यांनी तयार केलेली फुलं, द्रोण व इतर वस्तू त्याचप्रमाणे कराटे व दोरीवरील मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आले.

अंध, अपंग व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहणार नाही" हे ब्रीदवाक्य घेऊन नॅब काम करत आहे. अंध व्यक्तीला नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून तज्ञ व्यक्तींची व्याख्याने, कार्यशाळा, तांत्रिक शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन "नॅब"चे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी केले.

यावेळी सचिव गोपी मयूर, जेष्ठ पत्रकार मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, "नॅब"चे अध्यक्ष एड. बी.एफ. चुडीवाल, प्रकाश पाटील निकम, के. के. आव्हाड आदि उपस्थित होते.

भविष्यकाळात मुलांमधील गुणवत्ता पाहून त्यांना उच्चशिक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आर्थिक मदत केली जाईल. असे सांगून ते म्हणाले की, अंध व्यक्ती डोळस व्यक्ती पेक्षा हुशार असते. समोर बोलणाऱ्या व्यक्तीवरून बोलणारी व्यक्ती ओळखतात. काही ठिकाणी अंध मुलांबरोबर सर्वसाधारण मुली लग्न करण्याचे धाडस करतात ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचे रामेश्वर कलंत्री यावेळी म्हणाले.

दिव्यांगांसाठी गेल्या अनेक वर्षापासून काम करताना आनंद होतो. आज अनेकांना डोळे असूनही दृष्टी नाही, अशी खंत व्यक्त करून अ‍ॅड.व्ही. बी. चुडीवाल म्हणाले की, अंध व्यक्तीशी बोलताना गोडवा ठेवावा. दिसत नसले तरी त्यांचे व्हिजन मोठे आहे. बहुविकलांगाचे जीवन सुखकर होण्यासाठी अंध संस्था सतत काम करत असल्याचे त्यांनी सांगितले

यावेळी सत्कारमूर्ती पूजा भालेराव, बाळासाहेब भांड अ‍ॅड. रंगराव गुजर, , एस. बी. कुंकूलोळ आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका विना आंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती छाया शेळके, विनोद कांबळे, संजय गायके आदींनी विशेष परिश्रम घेतले.

अंधांसाठी नाशिक येथे आधुनिक होस्टेल

अंध विद्यार्थ्यांसाठी नाशिक येथे 2 कोटी रुपये खर्च करून साठ मुलांचे आधुनिक होस्टेल उभारणीचे काम सुरू आहे. ते दोन वर्षात पूर्ण होईल तसेच धुळे येथे अमरीश पटेल यांनी बांधलेले होस्टेल हे सर्वांना प्रेरणादायी असल्याचे रामेश्वर कलंत्री यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...