आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एसटीची दिवाळी; 11 काेटींचे उत्पन्न

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काेराेनाचे निर्बंध हटल्यामुळे दिवाळीच्या १० दिवसांच्या काळात एसटी महामंडळाच्या बसमधून दीड काेटी प्रवाशांची प्रवास केला. या माध्यमातून एसटीला ११ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. दिवाळीच्या काळात प्राप्त झालेल्या उत्पन्नातून एसटीचा ताेटा कमी हाेण्यास मदत हाेणार आहे. त्याचबराेबर पर्यटनासह धार्मिक ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची यावेळी मोठी गर्दी हाेत आहे.

काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा शासनाच्या वतीने सण उत्सवावरील निर्बंध हटवण्यात आलेे. यामुळे नागरिकांना सुट्यांच्या काळात गावी जाणे, पर्यटन, धार्मिक स्थळांवर जाण्यास पसंती दिली हाेती. प्रवाशांची हाेणारी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाकडून नियोजन करत जादा बस सोडण्यात आल्या हाेते. पुणे मार्गावर दर १५ मिनिटाला तर धुळे, मालेगाव, मुंबईसह विविध मार्गावर दर अर्ध्या तासाला बस सोडण्यात येत हाेत्या.

नाशिक शहरातील नवे सीबीएस, महामार्ग बसस्थानकासह विभागातील सर्वच बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या रांगा लागल्याची परिस्थिती दिसत हाेती. दिवाळीच्या काळात एसटी महामंडळातर्फे हंगामी भाडेवाढ करण्यात आली हाेती. यामुळे २१ नाेव्हेंबर ते ३१ नाेव्हेंबर या कालावधीत दीड काेटी प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. या माध्यमातून एसटी महामंडळाला दिवाळीच्या १० दिवसाच्या कालावधीत ११ काेटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. सणाेत्सवाच्या काळात एसटी महामंडळाला मिळालेल्या अधिकच्या उत्पन्नामुळे अधिकाऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

ताेटा कमी हाेण्यास मदत
प्रवाशांच्या सेवेसाठी अविरत धावणारे एसटी महामंडळाला काेराेनाच्या निर्बंधामुळे दाेन वर्षांपासून ताेटा सहन करावा लागत हाेता. त्यानंतर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे या ताेट्यात अधिकच भर पडली हाेती. मात्र, आता एसटीचे चाके धावू लागल्याचे उत्पन्नात भर पडत आहे. दरम्यान, आगामी काळात अधिकाधिक उत्पन्न प्राप्त हाेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असल्याची माहिती एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...