आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • DJ Sound Off; Cope With The Order Of The Police; Ganesh Mandals Are Upset With The Police Commissioner Showing The Court Order| Marathi News

दिव्य मराठी विशेष:डीजेचा आवाज बंदच; पाेलिसांचे आदेशावर बाेट; पाेलिस आयुक्तांनी न्यायालयाचा आदेश दाखविल्याने गणेश मंडळे नाराज

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या गणेशाेत्सवात विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवू द्या, अशी मागणी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पाेलिस प्रशासनह शासनाकडे लावून धरली असली तरी पाेलिस आयुक्तांनी मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार बंदीच असल्याने त्याची अंमलबजावणी करावे असे सांगताना डीजेचा आवाज बंदच ठेवला आहे. दरम्यान, पाेलिस प्रशासनाकडून न्यायालयाचा आदेशा पुढे केला जात असला तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे डीजेला परवानगी मिळण्यासाठी पुन्हा पाठपुरावा करणार असल्याचे गणेश मंडळांनी भूमिका घेतल्याने दाेघांमध्ये पुन्हा संघर्ष हाेण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

बाप्पाचं आगमन होत असतानाच पूर्वसंध्येलाच गणेशोत्सवात डीजे वाजवण्यावर पोलिसांनी बंदी घालण्यात आल्याचे परिपत्रक प्रसिद्धीस दिले आहे. या परिपत्रकात गणेश उत्सव साजरा करताना डीजे साउंड सिस्टिम यांचा वापर करण्यात येऊ नये, याएेवजी पारंपरिक वाद्याचा ताेही ध्वनिप्रदूषण हाेणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे. शहरात सुमारे ४५० हून अधिक सार्वजनिक मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याठिकाणी पेलिस बंदाेबस्त नियुक्त करण्यात आला आहे.

नियम माेडल्यास कारवाई
गणेशाेत्सवात डीजे सिस्टिम वापरास उच्च न्यायालयानेच बंदी घातली आहे. शासनानेही निर्णय न घेतलेला नाही. त्यामुळे न्यायालय आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करावी हाेईल.
जयंत नाईकनवरे, पाेलिस आयुक्त

शासनाकडे पाठपुरावा करू
मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनातच यंदाचा दहीहंडी, गणशाेत्सव, नवरात्राेत्सव निर्बंधमुक्त साजरा करण्याची घाेषणा केली आहे. त्याच धर्तीवर नाशकात विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करण्याची परवानगी मिळण्यासाठी पाेलिस आयुक्तांकडे मागणी केली. मात्र, पाेलिस प्रशासनाने परवानगी नाकारली. पदाधिकाऱ्यांशी बाेलून दिशा ठरविण्यात येईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीकडे पाठपुरावा करू
समीर शेटे, अध्यक्ष गणेशाेत्सव महामंडळ

बातम्या आणखी आहेत...