आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात मंकी पॉक्सचे रुग्ण आढळून येत आहेत. केरळमध्ये दोन रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
मंकी पॉक्स हा आजार ऑर्थोपॉक्स व्हायरस या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होते. काही प्रकारच्या खारी आणि उंदरामध्ये हा विषाणू आढळतो. या आजाराचा कालावधी ६ ते १३ आणि २१ दिवसांपर्यंत असू शकतो. रुग्णाला संसर्ग झाल्यानंतर २ दिवसांत त्वचेवर फोड येतात.
असा होतो प्रसार
थेट शारीरिक संपर्क, शरीर द्रव, लैंगिक संपर्क, जखम, घाव यातील स्त्राव, बाधित व्यक्तीने वापरेले कपडे आणि श्वसन मार्गातून होते. तसेच बाधित प्राणी चावल्यानंतर संसर्ग होतो.
हि आहेत लक्षणं
शरीरावर अचानक पुरळ, सुजलेल्या लसिका ग्रंथी, ताप, डोके दुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा, कानामागील काखेत जांघेत सुज, हे लक्षण आहेत. तसेच कांजण्या, नागीण, गोवर, हे देखील सदृश्य लक्षण आहेत. अशी लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करण्याचा सल्ला आरोग्यविभागाने दिला आहे.
अशी घ्या काळजी
संशयित रुग्णास वेळीच विलग करणे, रुग्णाच्या कपड्यांची अथवा अंथरुणाशी संपर्क येवू न देणे, हातांची स्वच्छता ठेवणे, आरोग्य संस्थेमध्ये रुग्णावर उपचार करतांना पीपीई किट वापर करणे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.