आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये दुफळी:पक्षनिष्ठा आम्हाला शिकवू नका; प्रभाग 10 च्या नगरसेवकांनी आ. हिरेंवर ठेवला गद्दारीचा ठपका

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर विभागात भाजपमध्ये दुफळी माजली आहे. पश्चिम नाशिक मतदार संघात पहिल्या विधानसभा निवडणूकीत आपल्याला कोणीच ओळखत नव्हते. स्वत: राहत असलेल्या प्रभागात भाजपाचा एकही नगरसेवक निवडून आणला नाही. स्वत:च्या मुलीला सिडकोतून उमेदवारी देण्यासाठी प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय करायचा. यातून खरोखर पक्ष वाढेल काय? तुम्ही काय आम्हाला पक्ष निष्ठा शिकवता? असा सणसणीत टोला भाजपा नगरसेवक शशीकांत जाधव, विक्रम नागरे, नगरसेविका इंदुबाई नागरे व पल्लवी पाटील यांनी आमदार सीमा हिरे यांच्यासह नगरसेवक दिनकर पाटील यांना लगावला आहे.

गेल्या आठवड्यात नगरसेविका माधुरी बोलकर यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक शशीकांत जाधव व पल्लवी पाटील यांना पक्षात उमेदवारी देण्यात येऊ नये यासाठी जोरदार विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आता प्रभाग क्रमांक 10 मधील नगरसेवकांनी ‘आम्हाला पक्ष निष्ठा शिकवू नका’ या मथळ्याखाली प्रसिध्दी पत्र काढले आहे. सातपूर विभागात शहर कार्यालयाची परवानगी न घेता व कार्यालयाला कोणत्याही प्रकारची माहिती न देता कुठेतरी बैठक घेतली. त्या बैठकीत तिघांवर स्वार्थापोटी आरोप करण्यात आले. आम्हाला पक्षनिष्ठा शिकवता, मग प्रभाग क्रमांक 8 मधून भाजपा नगरसेवकाच्या मुलाला पक्षाने उमेदवारी दिली असता, तुम्ही स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाही. आपल्याच पक्षाच्या महापौरांना त्रास देणे, रात्ररात्र महासभेमध्ये आंदोलनाचे नाटक करणे ही पक्षनिष्ठा असते काय?

तुम्ही बैठक घेणारे कोण?

कोणाला पक्षात ठेवायचे किंवा न ठेवायचे हे भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी, शहराध्यक्ष ठरवतील. त्यांना माहिती न देता परस्पर स्वतःच्या स्वार्थासाठी बैठक घ्यायची आणि भाजपा नगरसेवकांविरुद्ध षडयंत्र रचायचे. याला पक्षनिष्ठा म्हणतात काय? अशी बैठक शहर पदाधिकारी घेतील. तुम्ही ही बैठक घेणारे कोण? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.

आमदारांच्या भागात पक्षाचा एकही नगरसेवक नाही

जिथे चारही नगरसेवक निवडून आले तिथेच ढवळाढवळ न करता ज्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमदार राहतात. तिथे बीजेपीचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. त्याचे काय? गेल्या 7 वर्षात आपण साधे सातपूरचे बसस्टॅण्ड पूर्ण करु शकलो नाही. नागरिकांना याबाबत उत्तरे आम्हाला द्यावे लागतात. विकासाची कामे करण्याऐवजी कोणाचे तरी ऐकूण पक्षशिस्त मोडणे योग्य आहे काय? ग्रीनजीम आणि खेळणी हीच का आमदाराची विकासकामे ? कदाचित शशिकांत जाधव हे 2024 मध्ये आमदारकीसाठी प्रबळ दावेदार आहेत. म्हणून त्यांना बदनाम करण्याचा कट आहे काय? भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश चिटणीस विक्रम नागरे यांच्यामुळे तुमची ओळख झाल्याचेही पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...