आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबियांची भूतदया:श्वानाचे मरणाेत्तर धार्मिक विधी; तेराव्याला भजन-पूजन, प्राणी संस्थेला देणार आर्थिक निधी

सातपूर / विशाल देशपांडे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राण्यांमध्ये सगळ्यात प्रामाणिक प्राणी काेणता असे म्हटले तर आपसूकच श्वान अर्थात कुत्रा असे सांगितले जाते. म्हणूनच केवळ सुरक्षा म्हणून नाही तर घरातील एक सदस्य म्हणूनच त्याचे पालन केले जाते. मात्र ताे गेल्यावरचे दु:खही घरातील एखादा सदस्य गेल्यासारखेच असते. गाेविंदनगरमधील स्वाती साेमणे यांच्या ‘राजा’ या श्वानाचेही नुकतेच निधन झाले. साेमणे कुटुंबियांनी घरातील माणसाप्रमाणेच त्याचे मरणाेत्तर सगळेच धार्मिक विधी केले. एवढेच नव्हे तर त्याच्या तेराव्याला विशेष भजन, पूजन ठेवलेच पण, त्याच्या आठवणीत प्राणी संस्थेस मदत म्हणून निधीही देण्यात येणार आहे.

गोविंदनगर येथील स्वाती सोमणे यांच्या १४ वर्षांच्या ‘राजा’ या श्वानाचा ७ डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी त्याचे वय झाल्याने मृत्यू झाला. त्याचा ८ डिसेंबरला वाढदिवस असल्याने साेमणे कुटुंबियांनी घरी भजन-पूजनही ठेवले हाेते. मात्र आदल्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर घरातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती गेल्यासारखे त्यांनी या राजाचे सर्वच धार्मिक विधी केले.

एवढेच नव्हे तर त्याच्या तेराव्यालाही सर्व विधी करत सातपूरच्या गाैराई भजनी मंडळचा कार्यक्रमही ठेवण्यात आल्याने साेमणे कुटुंबियांच्या या भूतदयेबद्दल सर्वत्र चर्चा हाेत आहे. साेमणे कुटुंबीय भूतदयेच्या बाबतीत सर्वपरिचित आहेत. सेवानिवृत्तीनंतर त्या मुक्या जनावरांची सेवा करतात. त्यांना खायला देणे, त्यांची सुश्रुषा करणे हे त्यांचे राेजचेच काम झाले आहे. आर्थिक मदत करत प्राण्यांच्या सहवासात आनंद साेमणे कुटुंबीय आनंद शाेधतात. आता त्यांचा आवडता राजाच गेल्यानंतर त्यांनी प्राणी संस्थेला आर्थिक मदतही केली आहे.

वाढदिवसाची हाेती पार्टी साेमणे कुटुंबियांना राजा हा रस्त्यावर सापडला हाेता. छाेटेसे पिल्लू असलेल्या राजाला त्यांनी १४ वर्षांपूर्वी घरी आणले. ताे घरातील एखाद्या व्यक्तीप्रमाणे सदस्य झाला हाेता. त्यामुळे त्याचा ८ डिसेंबरला न चुकता वाढदिवसही करण्यात येत हाेता. यंदाही त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टीचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्या दिवशी भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्याबरोबर वाढदिवसाला ते प्राण्यांचे लाड पुरवण्यासाठी त्यांचे आवडते चॉकलेट्स, खाद्यपदार्थ ते प्रसंगी परदेशातूनही मागवत असतात. यावर्षी त्यांचा राजा १४ वर्षांचा झाला असल्याने व जास्त वय झाल्याने मुद्दामच त्याचा आवडीचा केक व इतर पदार्थही तयार करण्यात आले हाेते. मात्र वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्रीच त्याचे निधन झाले.

बातम्या आणखी आहेत...