आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या उद्योजकाकडून अर्पण:त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहासाठी 25 किलाे चांदीचा दरवाजा दान

नाशिक / सचिन जैन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहासाठी २५ किलो चांदी लावलेला साग व राजस्थानी लाकडापासून अत्यंत कलात्मक पद्धतीने तयार केलेला दरवाचा (एक संच) एका भक्ताने दिले आहेत. औरंगाबाद येथील उद्याेजक शेखर चंपालाल देसरडा असे या शिवभक्ताचे नाव असून त्यांनी साेमवारी सायंकाळी देवाच्या चरणी अर्पण केले. देवस्थान ट्रस्टकडून गर्भगृहाला सध्याच्या जुन्या लाकडी दरवाजांच्या जागी हा चांदीचा दरवाजा लावण्यात येणार आहेत.

यापूर्वीही देसरडा यांनी त्र्यंबकेश्वराच्या चरणी मोठ्या चांदीच्या मूर्ती भेट दिल्याची माहिती विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी दिली. गायधनी हे देसरडा यांचे पुरोहित आहेत. दानशूर देसरडा परिवाराचा यावेळी सत्कार करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या पत्नी अंजली कराड तसेच ट्रस्टचे चेअरमन न्यायाधीश विकास कुलकर्णी व पुरातत्व विभागाचे दानवे प्रामुख्याने उपस्थित होते. श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तृप्ती धारणे, संतोष कदम, भूषण अडसरे, दिलीप तुंगार तसेच अधिकारी अमित माचवे यांची यावेळी उपस्थिती होती.

देसरडा यांच्याकडून वेळोवेळी दान भगवान त्र्यंबकेश्वराचे निस्सीम भक्त असलेल्या देसरडा यांनी यापूर्वी वेळोवेळी त्र्यंबकेश्वरचरणी वेगवेगळ्या वस्तू अर्पण केल्या आहेत. यात १५ किलाे चांदीचा पंचमुखी मुखवटा, त्रिशूल, केळीचे पान, पाळ्यावरील चांदीचे आवरण, नैवेद्यासाठी सर्व चांदीची भांडी आदींचा समावेश आहे.

..असा आहे चांदीचा दरवाजा पु. ना. गाडगीळ सराफी पेढीने तयार केला चांदीचा दरवाजा. {प्रथमच दरवाजे एखाद्या भाविकाने दान दिले. {दरवाजावर सुंदर कलाकुसर. { चांदी आणि लाकूड दोन्ही मिळून वजन १०० किलोच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...