आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सेवानिवृत्तांकडून मविप्र ला एक लाखाची देणगी; 300 सेवानिवृत्त सेवकांसह शिक्षकांचा संस्थेतर्फे सन्मान

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मविप्र शिक्षण संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्यावसायिक व इतर विभागांतील सन २०१९ ते २०२१ या कालावधीतील ३०० सेवानिवृत्त सेवक व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थेसाठी एक लाखाची देणगी दाेन सेवानिवृत्तांनी दिली. संस्थेच्या प्रगतीसाठी इतरांनीदेखील याेगदान देणार असल्याची ग्वाही दिली.

संस्थेच्या कर्मवीरांनी १०८ वर्षापूर्वी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या हेतूने संस्थेची उभारणी केली. प्रारंभी राजाश्रय व लोकाश्रयानंतर शासनाच्या मदतीने संस्थेचा विस्तार झाला. संस्थापक, हितचिंतक यांच्यासोबतच शिक्षकांचेदेखील संस्थेच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान असून सध्याच्या घडीला विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी मूर्तिकाराच्या भूमिकेतून काम करणे गरजेचे असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष डाॅ. सुनील ढिकले यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले. व्यासपीठावर संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक शिवाजी पा. गडाख, डॉ. प्रसाद सोनवणे, नंदकुमार बनकर, विजय पगार, शोभा बोरस्ते, शालन सोनवणे, अॅड. लक्ष्मण लांडगे, सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे, जगन्नाथ निंबाळकर, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, डॉ. आर. डी. दरेकर, डॉ. एस. जे. कोकाटे उपस्थित होते.

सभापती बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, समाजातील शिक्षकांचे स्थान अतुल्य असून सेवानिवृत्त सेवकांकडून दिलेल्या सूचना किंवा मार्गदर्शनाचा संस्था नेहमी आदर करेल. संस्थेतील यावेळी प्रा. डाॅ. सुरेखा रामराव पाटील यांनी आपले वडील कै. आर. टी. सोनवणे व पती कै. एन. वाय. पवार यांच्या स्मरणार्थ प्रत्येकी ५१ हजार रुपये देणगी संस्थेला सुपूर्द केली. सौ. मंदाकिनी अशोक खरात यांनीदेखील सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेला ५१ हजार रुपयांची देणगी दिली. सूत्रसंचालन अर्चना गाजरे यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...