आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेदापूजनाने प्रारंभ:1000 सेवेकऱ्यांकडून रामकुंड परिसरात गाेदावरीची स्वच्छता

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत सक्रिय आरोग्यदूत अभियानाच्या वतीने गंगा गोदावरी स्वच्छता, गरजूंना वस्त्रदान, आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार अशी माेहीम हाती घेण्यात आली आहे. या माेहिमेला गाेदावरी स्वच्छतेने सुरुवात झाली. गाेदावरी पूजन केल्यानंतर पहिल्याच दिवशी एक हजार सेवेकऱ्यांनी रामकुंड ते टाळकुटेश्वर मंदिरापर्यंतच्या परिसराची स्वच्छता केली.

पंचवटीमधील खिमजी भगवानदास धर्मशाळेत एकत्रित झालेल्या सेवेकरी व भाविकांना श्री स्वामी समर्थ गुरूपिठाचे महाव्यवस्थापक चंद्रकांत मोरे आणि इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. केवळ एक दिवस स्वच्छता करून आपल्याला थांबायचे नाही. जगभरातील आठ हजारपेक्षा जादा केंद्रांच्या माध्यमातून आपल्याला वर्षभर सातत्याने हे स्वच्छता, वस्त्रदान आणि मोफत आरोग्य तपासणी, औषधाेपचार अभियान राबवायचे असल्याचे यावेळी त्यंानी सांगितले.

त्र्यंबकेश्वर ते आंध्र प्रदेशमधील राजमहेंद्री म्हणजे गोदावरी जेथे समुद्राला मिळते तिथपर्यंत त्या त्या भागातील सेवेकरी महिन्यातून एकदा हे अभियान राबवून स्वच्छता करतील. तसेच नदी प्रदूषण करण्यात निर्माल्याचादेखील वाटा असतो. यासाठी सेवेकऱ्यांनी घरी, सेवा केंद्रात निर्माल्याचे खत तयार करून त्याचा वापर करावा, असे आवाहनही मोरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...