आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जुम्मा'मध्ये बंद व आंदोलन नाही:अफवांवर विश्वास ठेवू नका; ऑल इंडिया सुन्नी मशाइख बोर्डचे अध्यक्ष हजरत मोईन मिया यांचे आवाहन

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होणाऱ्या बंद व आंदोलनाच्या खोट्या संदेशाकडे लक्ष न देण्याचे आवाहन ऑल इंडिया सुन्नी मशाइख बोर्डचे अध्यक्ष मोईन ए मिल्लत हजरत मोईन मियाँ यांच्याकडून करण्यात आले आहे.

भाजपाच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अवमानकारक शब्दांचा प्रयोग केल्याने भारतीय मुस्लिम बांधवांबरोबरच जागतिक पातळीवरील मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याची प्रचिती सर्वांसमोर आली आहे. पैगंबर मोहम्मद यांच्या अवमाननेच्या निषेधार्थ गेल्या शुक्रवारी भारत बंदचा निर्णय काही संघटनांकडून करण्यात आला होता.

मात्र,उद्या पुन्हा बंद व आंदोलनाची अफवा राज्यभरात काही लोकांकडून सोशलमिडीयावर पसरवली जात असल्याने मोईन मिया व रजा ऐकडमीचे प्रमुख हजरत सईद नुरी यांच्याकडून अशा अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...