आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंत्री झालाे म्हणून ताबडताेब काहीतरी करून दाखवताेय हे भासवण्यासाठी नदीजाेड प्रकल्पासह मराठवाड्याला पाणीपुरवठा करण्याचे नियाेजन करणारे नाशिकमधील कार्यालय हलवू नका. तसेच केद्रांकडून निधी वगैरे आणून देताे अशा अटी-शर्तीही खपवून घेणार नाही, असा प्रतिटाेला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना लगावला. नाशिक व मराठवाड्याला महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार पाणी दिले जात आहे. जितके पाणी असेल ते व्यवस्थितपणे व गरजेनुसार दिले जाईल, असेही भुजबळ म्हणाले.
भुजबळ म्हणाले की, नाशिक विरुद्ध मराठवाडा असे राजकारण करणे याेग्य नाही. प्रत्येकाला नियमानुसार ठरवून दिलेले पाणी मिळणारच आहे. अर्थात जितका पाऊस पडेल व जितके पाणी असेल ते सर्वांना समन्यायी तत्त्वानुसार दिले जाईल. दुसरी बाब म्हणजे, केंद्रांकडून निधी आणून देताे अशा अटीही टाकून चालणार नाही. जे काही द्यायचे ते विना अटी-शर्ती द्या, असे सांगत पाणीवाटपात काेणावरही अन्याय हाेणार नाही व त्यातून काेणाला कार्यालय काेठे नेण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.