आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठत्वाचा सल्ला:नामांतराचा वाद ताणू नका, सरकार अडचणीत येईल; भुजबळांचा शिवसेना व काँग्रेस नेत्यांना सल्ला

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुगलबंदी

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर पलटवार करत जशास तसे उत्तर दिले जात आहे. नामांतरावरून रंगलेला हा ‘सामना’ सरकारला मारक ठरण्याची शक्यता असल्याने वाद मिटविण्यासाठी महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळांनीच यात आता पुढाकार घेतला आहे. वाद इतका ताणू नका की यातून सरकार अडचणीत येईल, असा ज्येष्ठत्वाचा सल्लाही त्यांनी शिवसेना व काँग्रेस नेत्यांना दिला आहे. नामांतरावरून ‘सामना’तून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर टीका केली होती. औरंगजेबाच्या इतिहासाची उजळणी करत इतिहास पुन्हा वाचण्याचा सल्लाही दिला होता. राऊत यांच्या या टीकेला काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी समाज माध्यमावर जोरदार उत्तर दिले.

बातम्या आणखी आहेत...